सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 68 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई                           

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. 26) रोजी उपद्रव शोध पथकाने 68 प्रकरणांची नोंद करून 39 हजार 800 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 11 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वैद्यकीय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन 2 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 25 प्रकरणांची नोंद करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता. 26) रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत धुंमबारे इन्टरप्राईजेस भालदारपुरा टी.ए. रोड आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत श्याम स्वीट्स राम सुमेर बाबा नगर या दोन प्रतिष्ठानांकडून एकुण 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मल्टीकेअर हॉस्पिटल कांग्रेस नगर व इस्टीलीया अपार्टमेंट शंकर नगर, धंतोली झोन अंतर्गत गेलेक्सी असोसिएट्स चंद्र नगर आणि मंगळवारी झोन अंतर्गत कासिफ क्लिनिक मानकापूर रिंग रोड रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या चार प्रतिष्ठानांकडून एकुण 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत कमल पोलिक्लिनिक वायुसेना नगर हजारीपहाड सामान्य कचरऱ्यासोबत आढळलेल्या वैद्यकीय कचराऱ्याची अवज्ञा करणेबाबत यांच्याकडुन 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत डॉ वसंत कारटकर रेशिमबाग चौक रस्त्यालगत कचरा टाकणेबाबत यांच्याकडून 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत कामधेनु एग्रो मशीनेरी संघर्ष नगर चौक रस्त्याच्या कडेला दुकानातील कचरा जाळणे बाबत याच्याकडून 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 09 प्रकरणांची नोंद करून 70 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिम्बायोसिस स्कूल ऑफ प्लॅनिंग आर्किटेक्चर अँड डिझाईन-परस्पेक्टिव्ह 2024

Thu Jun 27 , 2024
नागपूर :- डॉ. नंदिनी कुलकर्णी संचालक यांच्या नेतृत्वाखाली, सिम्बायोसिस स्कूल ऑफ प्लॅनिंग, आर्किटेक्चर अँड डिझाईन (एसएसपीएडी) ने प्रेसक्लब, सिव्हिल लाईन्स येथे सौरभ डिझाईनने आयोजित केलेल्या ‘परस्पेक्टिव्ह 2024’ या कार्यक्रमात अभिमानाने भाग घेतला. या कार्यक्रमाने तरुण विद्यार्थ्यांसाठी करिअर म्हणून डिझाईनवर प्रकाश टाकला, ज्यामध्ये डिझाईनमधील सर्वोच्च संस्था आहेत. SSPAD चे प्रतिनिधी, डॉ. पूर्वा मांगे, इतर उद्योग प्रमुखांसह पॅनेल चर्चेत सामील झाले, डिझाइन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com