लिहिगावात दिवसाढवळ्या 65 हजार रुपयांची घरफोडी..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 24 : स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव गावातील एका कुलूपबंद घरातून दिवसाढवळ्या 65 हजार रुपयाची घरफोडी केल्याची घटना काल दुपारी 3 दरम्यान उघडकीस आली असून यासंदर्भात फिर्यादी प्रेमदास गजभिये वय 59 वर्षे रा वार्ड क्र 3 लिहिगाव ने कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 454,380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हे कामानिमित्त घराला कुलूपबंद करून घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून घराच्या दाराचे कुलुप तोडून घरात अवैधरित्या प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून आलमारीत सुरक्षित ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने अंदाजे किमती 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.यासंदर्भात अज्ञात आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

OCW organises 'Save Water' Walk-A-Thon

Sat Mar 25 , 2023
NAGPUR :- To mark week-long celebrations of World Water Day-2023, Orange City Water (OCW) organised a Walk-A-Thon with a motto of spreading awareness to “Save Water” & Judicious Use of Drinking Water on 24th March on the Walker Street in Civil Lines area . Around 350 OCWians men & women across all 10 zones participated in the event. During a […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!