– माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी केले 51 व्या वेळा रक्तदान !
वरुड :- ज्यावेळेस एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासते त्यावेळेस रक्ताची किंमत कळते. एका रक्ताच्या पिशवीमुळे एका रुग्णाचे प्राण वाचू शकतात, एवढी ताकद रक्तदानात आहे. यामुळे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घेऊन राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी प्रयत्न करावेत असे अवाहन माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
वरूड तालुक्यातील राजुरा बाजार येथील स्वर्गीय रुपेश गोमकाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिरात माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी राजुरा बाजार येथील रक्तदान शिबिरा मध्ये 51 व्या वेळा रक्तदान करून आज पर्यंत रक्तदान शिबीर राबविणाऱ्या सर्व आयोजकांचे मनस्वी आभार मानले. राजुरा बाजार येथील रुपेश गोमकाळे याच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदान शिबिरामध्ये 62 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व निभावले.
सामाजिक कार्यकर्ता म्हणुन ओळख असलेल्या मित्राचा अचानक मृत्यु झाला. मात्र त्याने केलेल्या कार्याची जाणीव ठेऊन त्याचे कार्य अविरत सुरु ठेवण्याचा ध्यास घेतलेल्या त्याच्या मित्रानी दरवर्षी त्याच्या स्मृतिदिनी रक्तदान शिबीर घेऊन समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न चालवीला. याच प्रयोजनातुन राजुरा बाजार येथील शिवशक्ती दुर्गा मंदिरात रक्तदान सीबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी रक्तदान करुन शिबिरास सुरुवात केली. या शिबिरात एकुण 62 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व निभावले. या रक्तदान शिबिरात डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संकलन केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी स्व. रुपेश गोमकाळे मित्र परिवार, जगदुरु नरेंद्रचार्य महाराज परिवार, शिवशक्ती मित्र परिवार, नवचैतन्य बहुउद्देशीय संस्था, स्वामी विवेकानंद सेवा संस्था, अवतार मेहेरबाबा सेवा संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.