अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यलयावर गोंदियातील काही शिव सैनिकांनी आज दुपारच्या सुमारास आमदार कार्यलयावर हल्ला चढवीत कार्यलयाची तोड फोड केली. हल्ला करणारे आरोपी हे सीसी टीव्ही कॅमऱ्या मध्ये कैद झाले. असून 6 आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर बाकी 1 आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर व कार्यालय समोर आता पोलिसाचा बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपला समर्थन दिल्याने काही शिवसैनिकांनी आज दुपारी कार्यालय हल्ला केला होता. घटनास्थळी गोंदिया पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी भेट देऊन पाहणी केली. व काही काही वेळातच 6आरोपीना पोलिसांनी अटक केली असून 1आरोपीचा शोध गोंदिया पोलिस करित आहे.