संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 10 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाईन रहिवासी तरुणाची नेट बँकिंगचे काम दरम्यान एसबीआय ची आलेली लिंक ओपन करून मागितलेल्या आधार कार्ड व पॅन कार्ड अपलोड करून आलेली ओटीपी ओपन केल्याने तरुणांच्या खात्यातून 59 हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार नुकतेच घडला असून यासंदर्भात फिर्यादी अभिषेक चहांदे वय 40 वर्षे रा न्यू खलाशी लाईन कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 420,सहकलम 66 सी ,66 डी अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.