– आमदार आशिष जैसवालांच्या प्रयत्नाने निशुल्क रोजगार व (अप्रेंटीशिप) शिकाऊ भरती मेळावा
कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहर येथील कुलदीप मंगल कार्यालय येथे शिवसेना शिंदे गटाचे रामटेक विधानसभाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नाने भारत सरकार मान्यता प्राप्त वैभव इंटरप्राईजेस (TPA) कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या माध्यमातुन शुक्रवार (दि.21) जून ला भव्य निशुल्क रोजगार व (अप्रेंटीशिप) शिकाऊ भरती मेळावा आयोजित करण्यात आला.
यावेळी रामटेक विधानसभा आमदार आशिष जयस्वाल यांनी यासंदर्भात म्हणाले की, अतिशय यशस्वी असा हा मेळावा ठरला असून अनेक मुंबई, पुणे, हिंगणा, बुटीबोरी, वाडी, मिहान, नागपूर, कामठी व क्षेत्रातील प्रतिथयश कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. या मेळाव्याला मिळालेल्या भरगच्च प्रतिसादातून हे स्पष्ट झाले की, रोजगाराची कमतरता नाही, रोजगार देणाऱ्यांची कमतरता आहे ती कमतरता या मेळावा माध्यमाने आम्ही पुर्ण करण्याचा प्रयत्न केला.
या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले व त्यांचे सहकारी यांनी केले. या मेळाव्यात 589 तरुणांनी आपली नावे नोंदविली. कार्यक्रमात 315 तरुणांनी इंटरव्यूव्ह घेण्यात आले. व 15 तरुणांना अपॉइंटमेंट ( लेटर ) प्रमाणपत्र देण्यात आले. सोबतच शिल्लक तरुणांना सेकंड इंटरव्यूव्ह करीता वैभव इंटरप्राईजेस (TPA) ऑफिस येथे बोलविण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी काशी रेड्डी, TPA चे डायरेक्टर मयुर उजवणे, माजी न.प. उपाध्यक्ष डायनल शेंडे, कन्हान शिवसेना शहरप्रमुख गज्जु गोरले, कन्हान शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा मनिषा चिखले, धनंजय सिंग, क्रिष्णकुमार अग्रवाल, जाफर अली सय्यद, रामु खड़से, चंद्रकुमार चौकसे, प्रमुख्याने उपस्थित होते, कार्यक्रमांचे सूत्र संचालन दीपचंद शेंडे यांनी केले.
या मेळाव्यात ऋषी नगरकर, शुभांगी घोगले, वैशाली श्रीखंडे, तेजस्विनी शेंडे, स्नेहल राणे, कल्पना नगरकर, विद्या बादुले, दिशा पाटील, छोटु राणे, प्रदिप गायकवाड, अनिल ठाकरे, हरीश तिडके, अजय चव्हाण,विजय खडसे, देवदास खड़से, सावन पात्रे, ज्ञानेश्वर खड़से, निक्कू पिल्ले, प्रशांत स्वामी, विनोद कांबळे, चेतन जयपुरकर, शशांक घोगले, राहुल बावणे, आकाश भगत, राहुल पाटील, अभिलाष पिल्ले, तनिष्क पिल्ले, आदि सह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात लाभ घेणारे युवक व युवतींनीं आमदार आशिष जैसवाल व आयोजक शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांचे आभार मानले.