सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 56 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (15) रोजी शोध पथकाने 56 प्रकरणांची नोंद करून 54400 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 5200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली.

दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लाजिंग बोर्डीगचे हॉटेल,सिनेमाहॉल मंगल कार्यालय असा सस्थांनी रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 14000 रुपयांची वसुली करण्यात आली. वैद्यकिय व्यवसायीकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 25000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून रु 4400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून रु 3000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वृक्षारोपण मोहीमेस सर्वांचे सहकार्य आवश्यक - आयुक्त विपीन पालीवाल

Fri Jun 16 , 2023
– मनपा करणार २५ हजार वृक्षाची लागवड – ५.६ टक्के हरित क्षेत्र वाढविण्याची गरज चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात मनपातर्फे २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असुन या मोहीमेत शहरातील सर्व नागरीक, स्वयंसेवी संस्था,लोकप्रतिनिधी यांचा सहभाग अतिशय आवश्यक असुन मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.  आज आपण वृक्ष लावले तर येत्या १० ते १५ वर्षानंतर त्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com