53 लाखाचा सुगंधित तंबाखू, पानमसाला व सुपारीचा साठा जप्त

नागपूर, दि.06 :   अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त धाडीत जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर प्रशासनाने धडक मोहीम राबवून प्रतिबंधित अन्न पदार्थ व सुपारीचा साठा जप्त केला. यामध्ये मे.जी.बी.गृह उद्योग, चिखली लेआऊट, कळमना येथून  33 लाख 13 हजार 340 रुपयाचा 12 हजार 894 किलो सुपारीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच अरुण कृष्णराव उमरेडकर, भुजाडे मोहल्ला, जुनी मंगळवारी., मोहम्मद साजिद शेख वल्द मोहम्मद ईस्माईल शेख, बकरी मंडी, मोमिनपुरा., सुहास गंगाधर मांडवगडे, निकालस मंदीर, फव्वारा चौक, इतवारी., शेर खान हबीब खान, मोमिनपुरा., राहुल अनिल जैस्वाल, यशोधरा नगर, रॉयल इंग्लिश स्कुलजवळ, हिंगणा रोड व प्रदिप शाहु, चांदमारी मंदिरजवळा, वाठोडा यांचेवर प्रतिबंधित अन्न पदार्थ संदर्भात कारवाई करुन त्यांच्या जवळून 2008.45 किलो रुपये 20 लाख 48 हजार 355 किंमतीचा सुगंधित तंबाखु व पानमसाला जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन येथील सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या नेतृत्तवाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड, पियुष मानवतकर, अमर सोनटक्के व अमितकुमार उपलम यांचा समावेश होता.

गुटखा, पानमसाला, सुगंधित स्वादिष्ट तंबाखु-सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचे उत्पादन, वितरण, साठवणूक व विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याची माहिती प्रशासनास देऊन गुटखाबंदी प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी सहकार्य करावे व जनतेने, विशेषत: युवा वर्गाने अशा प्रकारचे सेवन करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारासाठी 31 जानेवारी पर्यंत प्रवेशिका आमंत्रित

Thu Jan 6 , 2022
 नागपूर,दि.06  : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2021 करिता राज्य शासनावतीने देण्यात येणारा स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कर्यालयात तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 31 जानेवारी 2022 पर्यंत पाठविता येईल. दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com