तृतीयपंथीयांना मानाची जागा – ऍड पंकज यादव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- देशातील तृतीयपंथीयांना सामाजिक समता मिळून त्यांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. समाजाकडून होणारा त्यांचा उपहास, अवहेलना थांबवणारे तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक, २०१९ केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे.

हे विधेयक मंजूर झाल्याचा फायदा देशातील सर्व प्रकारच्या तृतीयपंथीयांना (ट्रान्सजेन्डर) होत आहे. समाजाने त्यांच्यावर लावलेला कलंक तसेच केला जाणारा भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी तसेच त्यांचा होणारा भावनिक छळ थांबून त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी या विधेयकाचा फायदा होत आहे.असे मौलिक प्रतिपादन ऍड पंकज यादव यांनी तालुका विधी सेवा समिती द्वारे कामठी येथील महिला समुपदेशन केंद्र येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात व्यक्त केले.

याप्रसंगी ऍड भीमा बोरकर, ऍड रिना गणवीर, महिला समुपदेशन केंद्र चे पदाधिकारी मीनाक्षी कांबळे, कल्पना सूर्यवंशी,सुरैय्या बानो आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रयत्न'जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Mon Feb 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रयत्न जनसंपर्क कार्यालय कामठी येथे छत्रपती श्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधान,प्रदेश युवा मोर्चा सचिव कपिल गायधने,शहर भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट,शहर संपर्क प्रमुख पंकज वर्मा,शहर महामंत्री भाजपा विजय कोंडुलवार,युवा मोर्चा शहर अध्यक्ष .कुणाल सोलंकी, .आशु अवस्थी, सुमीत शर्मा,.यश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com