सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 52 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (22) रोजी शोध पथकाने 52 प्रकरणांची नोंद करून 38,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 20,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा, इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे,प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5000 रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 1,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून 4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. वीराज इन्फ्रा यांच्यावर सी अँड डी कचरा अनधिकृत ठिकाणी टाकून एन. एम. सी. च्या आदेशांचे उल्लंघन केल्याबददल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. राधे संदीप इन्फ्रा यांनी रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचे चेंबर ब्लॉक केल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. हराना हाईटस यांच्या विरुध्द बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन श्री.राजेंद्र कावळे यांच्यावर बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला.तसेच मे. नीमजे ब्रदर्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. इंडीयन डेयरी यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला.तसेच मे.भगवान भरोसे भोजनालय यांनी भोजनालयाचे बेकार पाण्यानी चेंबर ब्लॉक केल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मंगळवारी झोन अंतर्गत मे. टी.डी.एस डीझाईन स्टोरी यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू. 50,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुजिगल ने नागपुर के धरमपेठ में अपनी संगीत अकादमी शुरू की

Fri Aug 23 , 2024
· मुजिगल ने आज अपनी पहली अकादमी लॉन्च की और दो और अकादमियां जल्द ही लॉन्च की जाएंगी · मुज़िगल ने संगठित संगीत शिक्षा उद्योग में खुद को एक प्रमुख खिलाड़ी के रूप में स्थापित करना जारी रखा है, अपनी पहुंच का विस्तार किया है और पर्याप्त प्रभाव डाला है नागपुर :- भारत का सबसे बड़ा संगीत शिक्षा मंच, मुज़िगल, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com