सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 51 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (16) रोजी शोध पथकाने 51 प्रकरणांची नोंद करून 54,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 3,6000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत्त 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 /- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 23 प्रकरणांची नोंद करून 4,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. 

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत सुनिल बजाज, इन्कम टॅक्स कॉलनी, यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत राहूल पिसे (बिल्डर्स) यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. रघुविर रेस्टॉरेंट यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच मे. एल एन गुप्ता ट्रान्सर्पोर्ट कंपनी यांनी वाहन दुरुस्ती करण्याकरिता फुटपाथ अतिक्रमीत केल्याने मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रू. 30,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत  देवेंन्द्र पटेल यांनी घराच्या मोकळ्या जागेवर अस्वच्छता पसरल्याने मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. सागर किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन मे. ट्रु वॅल्यु प्रोजेक्ट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू. 70,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"नेता जी की दावत...."

Thu Oct 17 , 2024
सुबह सुबह ताजा व्यंग्य आपके अवलोकनार्थ , प्रतिक्रिया की अपेक्षा , पसंद आए तो इस फॉरवर्ड करें….इसे छाप भी सकते है। नेताजी रात में चुनाव की चर्चा में लीन होकर नींद के आगोश में समा गए….सपने में भी कुछ बड़ा करने की बात को दोहराते रहे….पत्नी भी उनकी नींद में बड़बड़ाने की आदत से तंग आकर रात जाग कर बीता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!