सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 50 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. 05) रोजी उपद्रव शोध पथकाने 50 प्रकरणांची नोंद करून 24 हजार 900 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 10 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 17 प्रकरणांची नोंद करून 3 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता. 05) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत साई मिठान भंडार गरोबा मैदान, सतरंजीपुरा झोन अंतर्गत मनोहर किराणा स्टोर्स मस्कासाथ या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत रवि खुराना शंकर नगर बांधकामाचा कचरा रस्त्‍यालगत टाकल्याबाबत यांच्याकडुन 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत ज्ञान ज्योति अपार्टमेंट श्रीनगर नरेंद्र नगर रस्त्यालगत कचरा टाकणेबाबत यांच्याकडुन 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 4 प्रकरणांची नोंद करून 25 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोठे स्वप्न पहा आणि ध्येयाकडे वाटचाल करा - राजन शाह

Thu Jun 6 , 2024
– 8 जुन रोजी दुसरी कार्यशाळा नागपूर :- महानगरपालिका आणि मनपा कंत्राटदार वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये “लॉ ऑफ अट्रॅक्शन” संदर्भात क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते मुंबई येथील राजन शाह यांनी नागरिकांना मोठे स्वप्न कसे बघावे आणि ते पुर्ण करण्याकरीता कसे सकारात्मक रहायचे, या बद्ल माहिती दिली. त्यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com