32 टन कचऱ्यात दररोज निघते 5 टन प्लास्टिक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी :- कामठी शहरात आधुनिक पद्धतिचे बायोगॅस प्रकल्प निर्माण होण्याच्या चर्चेला उधाण आले असले तरी नगर परिषद चे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्रातील असुविधेअभावी संकलित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, या कचऱ्याचे करायचे काय?अशी अडचण निर्माण झाली आहे. कामठी शहरातून दररोज सुमारे 30 टन कचरा संकलित केला जातो .या संकलित कचऱ्यात 30 टन कचरा जमा असतो त्यामध्ये सुका व गिला कचऱ्याचा समावेश असतो त्यामध्ये सुमारे 5 टन प्लास्टीक असते.

बाजारपेठेतील दुकानदार तसेच किरकोळ विक्रेत्याकडून पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांची सर्रास विक्री व वापर केला जात आहे.संबंधित दुकानदार तसेच विक्रेत्यांवर नियमित कारवाही होत नसल्याने प्लास्टिक वापर व विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.कामठी शहरात विविध प्रकारचे व्यापारो व व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.कामठी नगर पालिकेकडे सुसज्ज असे धनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही ज्यामध्ये योग्य पद्धतीने घनकचरा प्रक्रिया करता येईल .आधुनिक पद्धतीचे घनकचरा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे मात्र उभारणीसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.शहरातून निघणाऱ्या 32 टन कचऱ्यातून 5 टन हा प्लास्टिक असतो आणि या संकलित प्लास्टिक मध्ये अमोनिया गॅस तयार होऊन आपोआप आगीत रूपांतर होत असते व धुक्याच्या स्वरूपात प्रदुषण पसरते जे नागरिकांना रोगराईचे निमंत्रण देत आहे.
बॉक्स:-मागील काही दिवसात कामठी नगर परिषद तर्फे संकलित कचरा केंद्रातून निघणारा धूर हा रात्रीच्या वेळी इतका भीषण असतो की पुढचा व्यक्ती डोळयासामोर दिसत नाही आणि नाकी नऊ येईल इतका तो दुर्गंध असतो त्यामुळे कित्येकांना श्वसनाचे विकार झाले आहेत याला जवाबदार कोण?आणि या प्रकारामुळे कुणाची जीवितहानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा?अशी विचारणा येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

– जाळले तर प्रदूषण, साठवले तर कचरा
—प्लास्टिक हा असा पदार्थ आहे की तो पुरला तरी नष्ट होऊ शकत नाही.अशा प्रसंगी जमा असलेल्या प्लास्टिक मध्ये आपोआप अमोनिया गॅस तयार होउन आग लागते आणि या आगीतून निघनारा धूर हवेत प्रदूषण करते त्यातून गंभीर आजार होतात .या प्लास्टीक च्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर दुष्परिनाम होत आहेत. प्लास्टिक पिशव्यांची पहिली समस्या म्हणजे या पिशव्यांचे विघटन होत नाही .पिशवीचे पूर्णपणे विघटन होण्यासाठी मोठा कालावधी लागतो यासाठी नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी शहरात काळी फिल्म असलेले वाहन मोकाट

Tue Nov 21 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कारच्या खिडक्यांच्या काचावर काळी फिल्म लावणे गुन्हा आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अशा वाहनावर कारवाही करता येते मात्र कामठी शहरात अशी वाहने मोकाट फिरत असून कामठी वाहतूक पोलीस विभागाने याकडे लक्ष देत नियम मोडणाऱ्या या वाहनावर कारवाही करणे गरजेचे आहे. वाहनांच्या काचावर काळ्या फिल्म लावू नये असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत .वाहनावर पारदर्शी फिल्म लावल्या जाव्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com