5 नगरपंचायती मधील उर्वरीत 11 जागांसाठी 85.38 टक्के मतदान

-सतीश कुमार संवाददाता ,गडचिरोली

गडचिरोली,(जिमाका)दि.18: जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा, व कुरखेडा नगर पंचायतीच्या निवडणुकीकरीता सरासरी 85.38 टक्के मतदान झाले.
यात अहेरी नगरपंचायतीकरीता 649 मतदारांनी (स्त्री – 320, पुरुष – 329 मतदार, एकूण टक्केवारी 80.82 ), सिरोंचा नगर पंचायतीकरीता 900 मतदारांनी (स्त्री – 475, पुरुष – 425 मतदार, एकूण टक्केवारी 81.23 ), चामोर्शी येथे 2375 मतदारांनी (स्त्री – 1178, पुरुष – 1197 मतदार, एकूण टक्केवारी 88.32), धानोरा येथे 272 मतदारांनी (स्त्री – 141, पुरुष – 131 मतदार, एकूण टक्केवारी 89.77 ), कुरखेडा येथे 676 (स्त्री – 351, पुरुष – 325 मतदार, एकूण टक्केवारी 84.18 ), यांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली. मतदानाची वेळ दुपारी 3.00 वाजेपर्यंत होती. यात सरासरी 85.38 टक्के मतदान झाले. पाच नगर पंचायतीच्या प्रभागासाठी निवडणूक घेण्यात आली. मत मोजणी दिनांक 20 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासन यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जिल्हा नियोजन मधून सन 2022-23 करीता 595.99 कोटींच्या प्रारुप आराखडयास मंजुरी

Tue Jan 18 , 2022
-सतीश कुमार संवाददाता ,गडचिरोली -जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न -आदिवासी जिल्हयातील सामान्यांसाठी जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती व्हावी- पालकमंत्री गडचिरोली,(जिमाका)दि.18 : आज झालेल्या ऑनलाईन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आर्थिक मर्यादेत प्रस्तावित नियतव्यय 395.99 कोटी व अधिक 200 कोटी अतिरीक्त मागणी असा मिळून 595.99 कोटींच्या प्रारुप आराखडयास 2022-23 करीता मंजूरी देण्यात आली. जिल्हयाचे पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com