नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी प्रलंबित 22 तक्ररींचा आढावा घेण्यात आला. आणि नवीन 5 तक्रारी निकाली काढण्यात आल्या.
उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक विश्वास आनंद यांच्यासह सहकार, आरोगय, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.