– त्वरा करा..३० जून पूर्वी ऑनलाईनरित्या मालमत्ता कर भरल्यास १५ टक्के सूट
नागपूर :- नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त ऑनलाईन माध्यमातून पूर्ण कर रक्कम नागपुर महानगरपालिकेत निधीत जमा केल्यास १५ टक्के सूट दिली जात आहे. याशिवाय ऑफलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या मालमत्ता धारकास १० टक्के सूट देण्यात येत आहे. मालमत्ता कर स्वरुपात आतापर्यंत (२० जून पर्यंत) मनपात ४९.५० कोटी रुपये जमा झाले असून, सर्वाधिक लाभार्थी लक्ष्मीनगर झोनमधून जमा झाला आहे. तरी मनपाच्या या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा व ऑनलाईन पेमेंट सुविधेचा देखील वापर जास्तीत जास्त करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी या योजनेसादर्भातील काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार, ३० जून २०२४ पूर्वी चालू आर्थिक वर्षाची पुर्ण कर रक्कम ऑनलाईन पेमेंट पद्धतीने नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास एकूण मालमत्ता कर रक्कमेवर १५ टक्के सूट दिली जाणार आहे. तर ऑफलाईन पद्धतीने ३० जून २०२४ पुर्वी चालू आर्थिक वर्षाची पुर्ण कर रक्कम नागपुर महानगरपालिका निधीत जमा केल्यास १० टक्के सूट दिली जाणार आहे. १ एप्रिलपासून ही योजना सुरू झालेली असून, योजनेद्वारे आतापर्यंत अर्थात २० जून पर्यत १.१० लक्ष मालमत्ताधारकाद्वारा रु ४९. ५० कोटी कर भरणा करण्यात आला आहे. १.१० लक्ष मालमत्ताधारकापैकी ४०३९६ मालमत्ताधारकानी आनलाइन सुविधेचा वापर करुन मालमत्ता कर नागपूर महानगरपालिका निधीत जमा करुन रु.२.४५ कोटी सुट प्राप्त करुन घेतली आहे.
यामध्ये लक्ष्मीनगर झोन आघाडीवर असून झोनमधील मालमत्ता धारकांनी योजनेचा लाभ घेत ८.४८ कोटी रुपये मनपा निधीत जमा केले. तर धरमपेठ झोनमधून ४.९७ कोटी रुपये, हनुमान नगर झोनमधून 5.95 कोटी रुपये, धंतोली झोनमधून ३.२८ कोटी रुपये, नेहरूनगर झोनमधून ५.३५ कोटी रुपये, गांधीबाग झोनमधून २.०० कोटी रुपये, सतरंजीपुरा झोनमधून १.३९ कोटी रुपये, लकडगंज झोनमधून ४.०९ कोटी रुपये, आशीनगर झोनमधून ३.९८ कोटी रुपये, मंगळवारी झोनमधून ६.०८ कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. तर शासकीय मालमत्तेद्वारा ३. ९० कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. असे एकूण ४९. ५० कोटी रुपये कर भरणा करण्यात आला आहे.