राष्ट्रीय लोकअदालतीत 148 प्रलंबित प्रकरणात 46 लाख रुपयांचा निपटारा

रामटेक :- तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.एम.सरोदे यांचे अध्यक्षतेखाली दिवाणी न्यायाधीश एच.एस. सातपुते, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश डी.एस.सैदाने यांचे सहकार्याने दिवाणी न्यायालय रामटेक येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमलेल्या पॅनल समोर दिवाणी व फौजदारी प्रकरणातील एकूण 148 प्रलंबित प्रकरणांचा आपसी तडजोड करून 46 लाख 16 हजार 812 रुपयाचा निपटारा करण्यात आला.

यावेळी भारतीय स्टेट बँक रामटेक चे शाखा व्यवस्थापक अभिषेक मिश्रा यांचे सह इतर बँकेचे मॅनेजर सह कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालतीत एड. रमन गजभिये, एड. वहाने, एड. देवडे , एड. आनंद गजभिये ,, एड. महेंद्र येरपुडे, एड.महाजन , एड. ए.जी. कारेमोरे, एड.एम. ए. गुप्ता, एड. के. एम. नवरे, एड. केला , एड. गायकवाड , एड. काशीकर एड.जयश्री मेंघरे यांचे सह तालुका वकील संघाचे इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळी न्यायालयीन कर्मचारी अधीक्षक एन. पी. उरकुडे, तेलंगे, वरिष्ठ लिपिक यु. एच. पवार , पकाडे, गिरडकर, कनिष्ठ लिपिक पी.एस. कामडी , शिपाई मदन जत्रे सह न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार उपस्थित होते. वेळेची व पैशाची बचत होत असल्यामुळे मिळालेल्या शिकवणीतून वाद वाढविण्यात अर्थ नाही लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणांचा आपसी समझोत्याने निपटारा करावा हे ध्येय ठेवून आपसी तळजोळीने न्यायाधीश व वकिलांच्या सहकार्याने पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला हे विशेष.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Significant footstep by NTEP, Nagpur Municipal Corporation in TB care for DRTB patients’

Tue Sep 12 , 2023
Nagpur :-As we are approaching our end TB deadline of 2025, new strategies are being implemented by NTEP for achieving a step towards TB elimination. Almost 50% patients seek care from private sector and providing free services of NTEP to private sector patients and getting information of patients from private sector is a difficult task. Nagpur corporation has always been […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com