अमरदिप बडगे,प्रतिनिधी
इंदोरा जंगल परिसरातील घटना ; घटने नंतर परिसरात वाघाची दहशत
गोंदिया – जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव जवळील इंदोर जंगलात वाघाची दहशत पाहायला मिळाली असुन वाघाने एका ४५ वर्षीय वैक्ती वर हल्ला असुन त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
मृतकाचे नाव बिनाय मंडळ ४५ वर्ष रा. अर्जुनी मोरगाव येथील अरुण नगर मधील असुन हा व्यक्ती काही कामा निम्मित अर्जुनी मोरगाव लगत असलेल्या इंदोर जंगलात गेला होता.तेव्हा जंगल परिसरात वाघाने हल्ला केला व त्याचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती परिसरात मिळताच परिसरातील लोकांनी, पोलिसांनी आणि वनविभाग यांना कळविले. त्यांनी जंगलात जाऊन पंचनामा करत मृत देह अर्जुनी मोरगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. या घटनेमुळे परिसरात वाघाची दहशतमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.