– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवारी (ता. 06) रोजी उपद्रव शोध पथकाने 42 प्रकरणांची नोंद करून 31 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करुन 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 01 प्रकरणची नोंद करुन 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरुवारी (ता. 06) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत अग्रवाल किराणा स्टोर्स बालाजी मंदिर रोड इतवारी, लकडगंज झोन अंतर्गत शाहु किराणा शॉप मीनी माता मंदीर पारडी या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत गृह ज्योती सेवा गजानन नगर रोड सामर्थ नगर कचरा रस्त्यालगत टाकल्याबाबत यांच्याकडुन 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत वी. वी. ईन्फ्रा विठ्ठल रुक्मिणी निवास शंकर नगर रस्त्यालगत कचरा जाळल्याबाबत यांच्याकडुन 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत हॉटेल रेहमान मंगळवारी मार्केट सदर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 5 प्रकरणांची नोंद करून 25 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.