चाळीस किलो गांजा जप्त.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 5 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जैस्वाल इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळ ट्रॅव्हल्स ने प्रवास करून अवैधरित्या भांग नावाचा प्रतिबंधित पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमास अटक करण्यात जुनी कामठी पोलीस व कळमना पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून 40 किलो भांग जप्त करण्याची कारवाही सकाळी 7.45 वाजता केली असून अटक आरोपीचे नाव दशरथ सिंह त्रैलोकी सिंह वय 45 वर्षे रा दर्यापूर उर्फ गुलालपूर ,इलाहाबाद असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमना पोलिसाना गुप्त बातमी दारा द्वारे माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक इसम चिखली चौक ,कळमना येथे एका पांढऱ्या रंगाच्या बोरीमध्ये भांग नावाचा प्रतिबंधित पदार्थ सोबत अवैधरित्या बाळगून घेऊन येत आहे आणि हा इसम कामठी नागपूर रोड वरील जैस्वाल इंडियन पेट्रोल पंप जवळ उतरणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सापळा रचून बसलेले पोलिस पेट्रोल पंप जवळ दडी मारून बसले असता सदर अटक आरोपी शेंदरी रंगाच्या राजा ट्रॅव्हल्स ने खाली उतरून लगेज कैबिनमधून दोन पांढऱ्या रंगाच्या भरलेल्या बोरी बाहेर काढल्या .पोलिसांनी वेळीच धाड घालून आरोपीवर धाड घालून 2 बोऱ्या तील 40 किलो भांगपत्ती किमती 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त, सहाय्यक पोलीस आयुक्त बी एन नलवाडे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील,गुन्हे पोलीस निरीक्षक महेंद्र आंभारे यांच्या मार्गदर्शनार्थ गंगाधर मुटकुरे,धनराज सिंगुवार,प्रशांत लांजेवार, यशवंत अमृते,वसीम देसाई, ललित शेंडे यांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Wed Apr 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 5 :- कामठी -मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वाखाली कामठी येथे आज 5 एप्रिल ला सायंकाळी 5 वाजता भारतीय जनता पार्टी व शिवसेनाच्या वतीने काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला कामठी शहर व तालुक्यातील हजारोच्या संख्येत सहभाग दर्शविलेल्या नागरिकांनी स्वातंत्र्य वीर गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावरकर गौरव यात्रा ही कामठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com