३७२५ मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या २५ कृत्रिम कुंड व ३ फिरत्या विसर्जन कुंडात एकुण ३७२५ मूर्तींचे विसर्जन बुधवार १२ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे.

शहरात दीड दिवस,दोन दिवस,पाच दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने त्या त्या दिवशी विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्याची गरज भासते. उत्‍सवादरम्‍यान होणारी गर्दी टाळण्‍याकरिता महापालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. सदर विसर्जन कुंड हे मनपा स्वच्छता विभागामार्फत नियमित स्वच्छ करण्यात येत असुन निर्माल्य कलशांची स्वच्छता करण्यात येत आहे.

या फिरत्या विसर्जन कुंडांसाठी झोननिहाय संपर्क क्रमांक महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.उभारण्यात आलेल्या २५ कृत्रिम कुंडात ३६४९ तर फिरत्या विसर्जन कुंडात ७६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.यात एकही पीओपी मुर्ती आढळुन आली नाही.

मागील वर्षी पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे तसेच सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जैन धर्मियांचे पर्युषण पर्व म्हणजे क्षमा आणि प्रेमाचा उत्सव - ना. सुधीर मुनगंटीवार

Thu Sep 12 , 2024
चंद्रपूर :- जैन धर्मातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षमायाचना आहे. क्षमा हे वीरांचे भूषण आहे. ज्यामध्ये अहंकार नसतो. क्षमावाणी पर्व मन, शब्द आणि शरीरातून क्षमा करण्याचा संदेश देत असून जैन धर्मियांचे पर्युषण पर्व म्हणजे क्षमा आणि प्रेमाचा उत्सव असल्याचे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जैन समाजातर्फे आयोजित जैन भवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com