३१ मार्चपर्यंत एकमुस्त वापरशुल्क भरणाऱ्या परवानेधारकांना मिळणार शास्तीमध्ये सूट

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या बाजार विभागांतर्गत येणाऱ्या परवाने धारकांद्वारे येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत थकीत आणि चालू वर्षाचे वापरशुल्क एकमुस्त भरल्यास त्यांना शास्ती मध्ये सूट देण्याचा महत्वाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आलेला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार बाजार अधीक्षकांद्वारे यासंबंधी आदेश जारी करण्यात आले आहे.

          मनपाच्या बाजार विभागा अंतर्गत येणारे दुकाने, ओटे किंवा जागांच्या वापरसाठी मनपाकडून वापरशुल्क आकारण्यात येते. हे वापरशुल्क वेळेवर न भरल्यास त्यावर विलंब शुल्क म्हणून शास्ती लावण्यात येते. या शास्तीमध्ये सूट मिळण्यासंदर्भात परवानाधारकांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २१ मार्च २०२२ रोजी मंजूरी आदेश जारी केले.

          मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आता ३१ मार्चपर्यंत थकीत व चालू वापरशुल्क एकत्रित भरणा-या मनपाच्या परवानाधारकांना शास्तीत सूट मिळणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मनपातर्फे नेताजी फुल मार्केट येथे स्वच्छतेबाबत जनजागृती रॅली

Thu Mar 24 , 2022
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेबाबत शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. बुधवारी (ता. २३) कॉटन मार्केट चौक, नेताजी फुल मार्केट येथे स्वच्छता जनजागृती रॅली काढून बॅन प्लास्टिक पिशवीचा वापर न करण्याचा संदेश देण्यात आला.           यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महाले,  उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, धरमपेठ झोनचे उपद्रव शोध पथक प्रमुख धर्मराज कटरे, धंतोली झोनचे उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com