रामटेक :- अंतर्गत मौजा गडमंदीर रोड रामटेक, दिनांक २६.११.२३ चे ०५.३० वा. ते ०६.३० वा दरम्यान, यातील फिर्यादी चा मुलगा मृतक नामे विवेक विश्वनाथ खोबागडे वय २१ वर्ष हा व त्याचा मित्र फैजान खान रा पवनी याचे सोबत त्याचे मोटर सायकल ने रामटेक येथे शोभायात्रे चा कार्यक्रम करीता आले होते, कार्यक्रम संपवुन गडमंदीर रामटेक वरुन मोटर सायकल ने डबल सिट घरी परत येत असता, गडमंदीर रोड वर त्याला आरोपी मनिष भारती व त्याचे मित्राने त्याची मोटर सायकल थांबवुन “आमची मोटर सायकलला ठोस लागली असे म्हणुन हातबुक्की ने लाताबुक्कीने मारहान केली. तसेच तुम्ही मुस्लीम व महार जाती चे असल्यानंतर इथे कशाला आले ? असे म्हणुन धमकी दिली. काही वेळाने फैजल चा भाउ तिथे आल्यानंतर मनिष भारती नावाचा इसमाने त्याचे गाडीचे नुकसान झाल्याचे सांगुन फैजल च्या भावाकडुन १०,०००/रु घेतले. फैजल व विवेक यांना गाडी चालवणे होत नसल्याने व ते घाबरले असल्याने पोस्टे ला तकार देण्यास न येता दोघेही गाडी ने परत आले. दि २६.११.२३ रोजी सकाळी ०६/०० वा फिर्यादी कामावरुन घरी परत आला, तेव्हा मुलगा विवेक याला मार लागल्याचे पाहुन त्याला उपचार कामी डॉ सुधीर नाकले रा पवनी यांचे दवाखान्यात नेले तेथुन रेफर केल्याने चौधरी हॉस्पीटल कामठी येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मरण पावल्याचे सागितले.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे विश्वनाथ गोवर्धन खोब्रागडे वय ५१ वर्ष रा. सितापुर देवलापार ता. रामटेक जि. नागपुर यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. रामटेक येथे आरोपी क १) मनिष बंडुजी भारती वय ३७ वर्ष २) जितेद्र गजेंद्र गिरी वय २३ वर्ष ३) सत्येंद्र गजेंद्र गिरी वय २५ वर्ष तोन्ही रा. अंबाडा वार्ड रामटेक जि. नागपुर यांना सदर गुन्हयात अटक करून त्यांचेवर कलम ३०२,३४१,३२३,५०४, ५०६, ३४ भादवी सह कलम ३(२) (पाच) अनुसुचित जाती जमाती प्रतीबंधक कायदा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासात आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे रामटेक विभाग हे करीत आहेत.