नागपूर :- दिनांक १९.०७.२०२३ चे २३.०० वा. चे दरम्यान फिर्यादी रिजवान अहमद अब्दुल रहमान वय ४८ वर्ष रा. लेंडी तलाव, पाचपावली हे पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत टिपू सुलतान चौक, संघर्ष नगर येथे त्यांचे सासर यांचे घरी आपले स्प्लेंडर क. एम.एच. ३१ डि.एम ५०३२ ने गेले व गाड़ी लॉक करून ठेवली असता. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची मोटरसायकल चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम ३७९ भा.दं.वी प्रमाणे गुन्हा दाखल होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क ५ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून आरोपी फैजान अहमद वल्द नियाज अहमद वय २० वर्ष रा. नया बाजार, बड़ी मस्जिद समोर, कामठी यास ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता आरोपीने त्याचा साथिदार सैय्यद दानिश वल्द सय्यद समी वय २० वर्ष रा. कोळसा टाल हसन कवाडीचे घराजवळ, कामठी याचे सोबत वरील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. गुन्हयातील वाहन किमती ४०,०००/- रू चे जप्त करण्यात आले. आरोपींना सखोल विचारपूस केली असता त्यांनी २) पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत गोडपूरा, येरखेडा येथून एम. एच ४० ए.एस ९५९८ किमती ४०,०००/- रु ३) पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत येरखेडा येथुन एम.एच ४० वि.वाय. ०२९६ किमती ४०,०००/- रू. ४) पोलीस शांतीनगर हद्दीत प्रेम नगर, नारायणपेठ येथून एम.एच ४९ बि.एल ३९०९ किमती ४०,०००/- रू ५) पोलीस ठाणे कळमणा हद्दीत प्लॉट नं. १, कळमणा वस्ती, वांजरा रोड येथून एम. एच – चि.वाय ८.४६२ किमती ४०,०००/- रू चे असे एकुण ५ वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीनी वरील वाहने त्यांचा साथिदार आरोपी क्र. ३) सैय्यद हस्तीयाक वल्द सैय्यद मुस्ताक वय ४० वर्ष रा. अक्कर मस्जिद जवळ, कामठी याला विक्री केल्याचे सांगीतले. त्याला सुध्दा नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. आरोपीचे ताब्यातुन वरील पाचही वाहने तसेच गुन्हा करतांना वापरलेले वाहन अॅक्टीव्हा जी मोपेड क. एम.एच ४० बि.ए. ६०२९ किमती ७०,०००/- असा एकूण २,७०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालासह यशोधरानगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली पनि गजानन कल्याणकर, सपोनि भोपळे, पोउपनि आशिष कोहळे, पोहवा रामचंद्र कारेमोरे, प्रमोद वाघ, रामनरेश यादव, रोनॉल्ड अॅन्थोनी, नापोअ, राजेन्द्र टाकळीकर, राजू टाकळकर, निखील जामगडे पोअ, अमोल भक्ते, योगेश महाजन यांनी केली.