संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत तहसीलदार,
मुख्याधिकारी मुख्यालय सोडू नका- खासदार श्यामकुमार बर्वे
कामठी ता प्र 11:-कामठी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिकीय बिघाडामुळे शहरातील काही भागात मागील पाच दिवसापासून पाणीपुरवठा होत नसून भर उन्हाळ्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . नागरीकांच्या ह्या समस्येला गांभीर्याने घेत नागरी हितार्थ जनसेवक म्हणून नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आज सकाळी 10.30 वाजता तडकाफडकी कामठी नगर परिषद कार्यालयात तातडीची बैठक घेत उपस्थित मुख्याधिकारी व तहसीलदार ला ही समस्या प्राथमिकतेने सोडविण्याचा प्रयत्न करा, कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही तसेच पाणी पुरवठा ठप्प असलेल्या भागात नगर परिषद तर्फे मोफत टॅंकर पाठवून नागरिकांना पाणीपुरवठा करा तसेच 24 तासाच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करा व पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यानी मुख्यालय सोडू नका असे फर्मान सोडले.
कामठी शहरातील रमानगर उदानपुलाचे बांधकाम प्रगती पथावर असून या कामात अडसर ठरत असलेल्या पाईप लाईन इतर मार्गाने वळती करत भविष्यात अडचण न व्हावी यासाठी कायमस्वरूपी पद्धतीने जलशुद्धीकरन केंद्रातून पाणी पुरवठा पाईप लाईन वळती करीत भूमिगत करण्याचा कामाला मागील पाच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले या कामात तंत्रिकीय अडचण येत असल्याने काही भागात पाणी पुरवठा खंडित होत असल्याची वास्तू स्थिती आहे मात्र यामुळे भर उन्हात नागरिकांना पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी कामठी नगर परिषद सभागृहात तहसीलदार गणेश जगदाळे, मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मुख्य उपस्थितीत तातडीची बैठक बोलावून सदर पाणी पुरवठा कामाचा आढावा घेत आपण लोकसेवक असलेले प्रशासनिक अधिकारी, लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत.नागरिकांना सोयी सुविधा पुरवून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याची जवाबदारी आपल्या सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींची आहे त्यातच नागरिकांची मूलभूत गरज असलेल्या पाणी पुरवठा होत नसल्याची बाब अतिशय असह्य करणारी बाब आहे तेव्हा या बाबीला गांभीर्याने घेत पाणी पुरवठा करण्यात होत असलेल्या अडचणींचा आढावा घेत त्यावर योग्य त्या उपाययोजना करीत लवकरात लवकर कुशल ,
प्रगतिशील तंत्रज्ञ लावून सदर तंत्रिकीय प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्णत्वास आणून कामठी शहरातील काही भागात होणारा ठप्प पाणीपुरवठा हा येत्या 24 तासात सुरळीत सुरू करा.व नागरिकांना पाण्याची सोय द्या तसेच पाणीपूरवठा सुरळीत होई पर्यंत तहसीलदार ,व मुख्याधिकारी मुख्यालय सोडू नका असे आदेश खासदार श्यामकुमार बर्वे यांनी दिले.यावर मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी उद्या सकाळ पर्यंत ठप्प पाणी पुरवठा चा विषय मार्गी लागणार असून पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी हमी दिली.
या बैठकीला तहसीलदार गणेश जगदाळे,नायब तहसिलदार अंबादे,मुख्यअधिकारी संदीप बोरकर, जलप्रदाय अभियंता अवी चौधरी,नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, कामठी नगर परिषद चे माजी अध्यक्ष शकुरभाई नागानी, माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, माजी उपाध्यक्ष सविता ताई शर्मा, माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान,मो अहफाज अहमद,माजी नगरसेवक नीरज लोणारे, माजी नगरसेविका वैशाली मानवट कर,माजी नगरसेवक रमेश दुबे,आशिष मेश्राम, राजकुमार गेडाम आदी उपस्थित होते.
बॉक्स:-निर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी नागरी समस्येचा एक भाग असलेली मागील पाच दिवसापासून होत असलेला ठप्प पाणीपुरवठा संदर्भात मदतीची धाव घेत समस्या मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकाराची भूमिका घेतल्याने नागरिकातर्फे खासदार श्यामकुमार बर्वे चे कौतुक करण्यात येत होते.