अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी २३५ कोटी दंड आकारणी

गडचिरोली :- रेल्वे मार्गाच्या भराव्याकरिता अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जिल्हा भरारी पथकाच्या सनियंत्रणात मागील तीन दिवसापासून मोठ्या क्षेत्राची तांत्रिक मोजणीची कार्यवाही सुरू होती. आज ती पूर्ण झाली असून संबंधित जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस तब्बल २ लाख ७३ हजार ३५१ ब्रास अवैध उत्खननाकरिता २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची रक्कम का आकारणी करू नये, याबाबत नोटिस बजावण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी गठीत केलेल्या विशेष जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख तहसीलदार संजय पवार यांच्या निगराणीखाली ही कारवाई केली गेली. तहसिलदार हेमंत मोहरे यांनी दंड आकारणीच्या नोटीसा बजावल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय भांडारकर, कनिष्ठ अभियंता इंदुरकर, शाखा अभियंता अभिजीत शिनगारे, भूमी अभिलेखचे अभिलेखापाल व्हि. एल. सांगळे व त्यांच्या चमूने अवैध उत्खननाची तांत्रिक मोजणी करून तहसीलदार गडचिरोली यांच्याकडे अहवाल सादर केला त्यानुसार पाचपट दंड आकारणी करण्यात आली आहे.

अहवालानुसार खरपुंडी येथे सर्व्हे क्रमांक ५३/२/अ आणि ५४ मध्ये १३ हजार २५७ ब्रास मुरूम उत्खननाकरिता ११ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपये, लांजेडा स.क्र. १४/२६ आणि २४० मध्ये ९ हजार ६९९ ब्रास करिता ८ कोटी ३४ लाख११ हजार ४०० रुपये, माडेतुकूम स.क्र.१८ मध्ये १८ हजार ३५८ ब्रास करिता १५ कोटी ७८लाख ७८ हजार ८०० रुपये, गोगाव स.क्र.१८ मध्ये २० हजार ७७५ ब्रास करिता १७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये, अडपल्ली स.क्र.१८ मध्ये ५० हजार १७६ ब्रास करिता ४३ कोटी १५ लाख१३ हजार ६०० रुपये, काटली स.क्र. १४५ आणि २७९मध्ये ५४ हजार ५७५ ब्रास करिता ४६ कोटी ९३ लाख ४५ हजार रुपये, मोहझरी स.क्र. २५, ३२,२१,९व १५ मध्ये ६२ हजार ६१७ ब्रास करिता ५३ कोटी ८५ लाख ६ हजार २०० रुपये आणि साखरा येथे स.क्र. १०२ व १५२ मध्ये ४३ हजार ८९४ ब्रास करिता ३७ कोटी ७४ लाख ८८ हजार ४०० रुपये असे एकूण २ लाख ७३ हजार ३५१ ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची गणना करण्यात आली आहे. याविषयी तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्या केदार लड़ सकते हैं विधानसभा चुनाव ?

Tue Jun 18 , 2024
– 20 जून को हाईकोर्ट में सुनवाई नागपुर :- नागपुर जिला केंद्रीय सहकारी बैंक घोटाले में पूर्व मंत्री सुनील केदार को कोर्ट द्वारा सजा सुनाए जाने के बाद एड. राहुल नार्वेकर ने अपनी विधायकी रद्द कर दी. हालांकि, केदार पा ने अगले तीन महीने में होने वाले विधानसभा चुनाव लड़ने के लिए हाई कोर्ट में याचिका दायर की है, जिस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com