नागपूर :- नागपूर महानगरपालिका व इंडियन कॅन्सर सोसायटी नागपूरच्या विद्यमाने सोमवार (ता. २४) रोजी मनपा डीप्टी सिग्नल समाज भवन परिसरात मनपा संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थीनींकरीता गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल सूद गोयल, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, मनपा वैद्यकीय अधिकारी (डीप्टी सिग्नल) डॉ. वलीउर रहमान, संजय नगर शाळेच्या प्राचार्य श्रीमती गीता दांडेकर, अशोक राठी सी.एम.डी, सी-डेट एक्सप्लोसिव्ह इंडस्ट्रीज प्रा. लि., डॉ. देशपांडे, डॉ. मनमोहन राठी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
मुलींचे आरोग्य भविष्यात सुदृढ राहावे व त्यांना कॅन्सर सारखे आजार होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वाव्हॅक (CERVAVAC Vaccination) लस देण्यात येते. याच अंतर्गत मनपा व इंडियन कॅन्सर सोसायटी नागपूरच्या संयुक्त विद्यमाने डीप्टी सिग्नल समाज भवन परिसरात ९ ते १४ वयोगटातील मुली/महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव करणारी लस (सर्वाव्हॅक लसीकरण) लकडगंज झोन येथील मनपा संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थीनींना देण्यात आली. यावेळी २२५ विद्यार्थीनींना सर्वाव्हॅक (CERVAVAC Vaccination) ही लस देण्यात आली. या लसीचा दुसरा बुस्टर डोज २५ ऑगस्टला देण्यात येणार आहे.
यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल सूद गोयल यांनी उपस्थितांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले. भविष्यात महिलांना होणारे आजार या लसीकरणामुळे कसे टाळता येतील तसेच त्यांचे आयुष्य कसे सुदृढ होईल याविषयी त्यांनी माहिती दिली. सर्वाव्हॅक (CERVAVAC Vaccination) ही लस सुरक्षित आहे. येणाऱ्या काळात इतर शाळेमध्ये देखील या लसीकरणाचे कार्यक्रम नक्की घेऊ असे त्या म्हणाल्या.
ब्रेस्ट कॅन्सर नंतर सर्व्हायकल कॅन्सर हा जास्ती प्रमाणात महिलांमध्ये पहिला जाते. सर्व्हायकल कॅन्सर सारखे भयावह आजार महिलांना/मुलींना होऊ नये ते या त्रासातून जाऊ नये याकरिता सर्वाव्हॅक (CERVAVAC Vaccination) ही लस देण्यात येते. मनपातर्फे घेण्यात आलेला लसीकरणाचा कार्यक्रम खरंच प्रशंसनीय आहे. सर्वाव्हॅक (CERVAVAC Vaccination) ही लस घेणे सुरक्षित आहे तसेच याचे सकारात्मक परिणाम शरीरावर होतील. तसेच यामुळे महिला/ मुलींचे आयुष्य स्वस्थ राहील असे मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर म्हणाले.