नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, लघुशंका करणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. या अंतर्गत गुरुवारी(२०) रोजी शोध पथकाने २२० प्रकरणांची नोंद करून ८१ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल केला. आतापर्यंत २,७०७ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, ११,४६,७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
शहराला स्वच्छ आणि सुंदर साकारण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करीत अस्वच्छता पसरविणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या (व्यक्तीने) ३९ प्रकरणांची नोंद करून रु ३९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सगळयांवर प्रत्येकी रु १०० प्रमाणे दंड लावण्यात आला.
तर सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणा-यावर 1 प्रकरणांची नोंद करुन रु ५०० रुपयांचा दंड वसुल केला आहे. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १४ प्रकरणांची नोंद करून २८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सगळ्यांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) पसरविणे या अंतर्गत ४९ प्रकरणांची नोंद करून १९,६०० रुपयांची वसुली केली आहे. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत २० प्रकरणांची नोंद करून रु ८००० दंड वसूल करण्यात आलेला आहे.
दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. २०००/- दंड) या अंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून रु ८००० दंड वसूल करण्यात आला. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. २०००/- दंड) या अंतर्गत ५ प्रकरणांची नोंद करून रु १०,००० दंड वसूल करण्यात आला. रास्ता, पादचारी मार्ग, मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करण्याऱ्या(रु. १०००/ दंड) १ प्रकरणाची नोंद करून १००० रुपये दंड वसूल करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर ७४ व्यक्तिविरुध्द (रु.२००/ दंड) प्रकरणांची नोंद करून १४८०० रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. तसेच उपद्रव करणा-या संस्थांकडून १३ प्रकरणांमध्ये १३,००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.