नागपूर :- राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कायाकल्प पुरस्कार योजनेत नागपूर महानगर पालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांना सन २०२३-२४ चे कायाकल्प पुरस्कार जाहीर झालेले आहेत. नागपूर महानगर पालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगाबाई टाकळी ला २.०० लक्ष रु. विजेता प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा ला १.५० लक्ष रु प्रथम उपविजेता , नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कपिल नगर ला १.०० लक्ष रु व्दितीय उपविजेता आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नारा,शांतीनगर,फुटाला, जगनाथ बुधवारी, जयताळा, बाबुलखेडा, दीप्ती सिग्नल, के.टी.नगर, मानेवाडा, चिंचभवन, शेंडे नगर,भालदारपुरा, पाचपावली, सोमलवाडा व बिडीपेठ या १५ संस्थांना रु.५०,०००/- चे प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाले आहे.
कायाकल्प योजने अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील तसेच महानगर पालिकेतील सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा सहभाग असतो. महानगर पालिका स्तरावरील आरोग्य विभागाचे एक पथक अंतिम परीक्षण करते.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांचे मार्गदर्शनात , वैद्यकीय अधिकारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी कायाकल्प सूचीनुसार अंमलबजावणी केली.त्यानुसार आरोग्य केंद्रातील स्वच्छता, बाह्यरुग्ण विभाग, रुग्णांना बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, संस्थेची देखभाल,जैविक कचरा व्यवस्थापन, जंतू संसर्ग व्यवस्थापन इत्यादी सर्व बाबींवर मुल्याकन करून गुणांकन करण्यात आले.
नागपूर महानगर पालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगाबाई टाकळी ९८.३०% गुण प्राप्त करून राज्यात प्रथम आणि नागपूर महानगर पालिका मधून विजेते ठरले आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा ९७.९०% (प्रथम उपविजेता) व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कपिल नगर ९४.६०% (व्दितीय उपविजेता) गुण घेवून उपविजेते आहेत.
प्राप्त पुरस्कारासाठी नागपूर महानगर पालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी व अति.आयुक्त(शहर) आंचल गोयल यांनी सर्व संस्थांना सुभेछ्या दिल्या आहेत. संस्थाना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर , अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार यांचे मार्गदर्शन मिळाले. शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अश्विनी निकम, शहर लेखा व्यवस्थापक निलेश बाभरे व शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ.राजेश गं. बुरे यांनी सर्व बाबींबाबत योग्य ते समन्वय व मार्गदर्शन संस्थांना दिले.