बोरडा टोल नाका जवळ ट्रकची कारला धडकेत कार चे २०,००० रुपयाचे नुकसान.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन किमी अंतरावरील नागपुर बॉयपास राष्ट्रीय चारपदरी बाय पास महामार्गावर बोरडा टोल नाका जवळ ट्रक चाल काने टोल नाक्यावर उभा असताना अचानक मागे न पहता निष्काळजीपने आपल्या ताब्यातील ट्रक वेगाने रिवर्स घेऊन मागे उभ्या असलेल्या कार ला धडक मारून कार चे २०,००० रुपयाचे नुकसान केल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
राजेश रत्नाकर मामीडवार वय ५२ वर्ष राह. तुळजा नगरी आर्वी रोड यवतमाळ हे श्रीराम चीट्स फायनान्स इंडीया लि.यवतमाळ येथे डेव्हलपमेन्ट ऑफीसर या पदावर मागील १५ वर्षापासुन कार्यरत असुन नागपुरला हेड ऑफीस असल्यामुळे त्यांचे येणे जाणे सतत असते. शुक्रवार (दि.५) ऑगस्ट ला राजेश मामीडवार यांचा कंपनी फायनान्स बाबत पेंच पारशि वनी येथे मिटिंग असल्यामुळे राजेश मामीडवार हे सकाळी ९ वाजता दरम्यान हे यवतमाळ येथुन आप ल्या स्वताच्या शेवरलेट कंपनीची युवासेल कार क्र. एम एच -२९ -एडी ३८१६ या वाहनाने मिटिंग करीता सहकारी सोबत निघाले असता अंदाजे दुपारी १२ वाजता राजेश मामीडवार हे बोरडा टोल नाका कांद्री येथे त्यांच्या कार समोर ट्रक क्र. एम एच – ४० – सीडी – ३५१४ च्या ट्रक चालकाने टोल नाक्यावर टोल भर ण्यास उभे असताना अचानक इन्टीकेटर न देता, मागे न पहता, निष्काळजीपने आपल्या ताब्यातील ट्रक वेगाने रिवर्स घेऊन कार च्या समोरील बाजुस धडक मारल्याने त्यांच्या कारच्या समोरील बंपर बॉनेट, उज व्या बाजुचे हेड लाईट तसेच ड्रायव्हर साईडच्या दरवा ज्याचे असे मिळुन २०,००० रूपयाचे नुकसान झाल्या ने कन्हान पोलीसांनी राजेश मामीडवार यांचा तोंडी तक्रीरू वरून पोस्टे कन्हान ला ट्रक क्र. एम एच – ४० – सीडी – ३५१४ चा चालक आरोपी असलम शौकत शेख वय ४५ वर्ष राह. मोहाडी तुमसर जि.भंडारा यांचे विरुद्ध अप क्र. ४७० /२२ कलम २७९ , ४२७ भादंवि सहकलम आर डब्लु ५०/१७७, १०४/ १७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पो लीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान तारसा रोड चौकातील दोन जाहीरात होल्डींग चोरी.

Sat Aug 6 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – अंतर्गत ०.५ कि.मी. अंतरावर तारसा चौक कन्हान येतील महाकाली कॉम्पलेक्सच्या वरती १५/२० चे असे दोन जाहीरात होल्डींग लावण्यात आले होते. होल्डींग ला वापरण्यात आलेले लोंखडी एंगल, चँनल, नट बोल्ट असा एकुण ३,३०,३६४ रूपये चा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेल्याने पोस्टे कन्हान येथे चोरी चा गुन्हा दाखल करून आरोपी चा शोध सुरू आहे. तारसा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!