नागपूर :- दिनांक २३,०६,२०२३ चे ११.३० वा. दरम्यान फिर्यादी राजकुमार ग्यानचंद अडवाणी वय ५३ वर्ष रा. कडबी चौक, जरीपटका यांनी पोलीस ठाणे प्रतापनगर हदीत मंगलमुर्ती चौक, जयताळा रोड, गणेश अपार्टमेंट पार्किंग मध्ये आपली अॅक्टीव्हा क. एम.एच ४९ ए. एवं १९५७ लॉक करून ठेवली असता. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची मोपेड चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट १ ने अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन आरोपी वैभव नारायण भांडेकर वय ३० वर्ष रा. सिमटाकळी, मंगलथान सोसायटी, गॅस गोडाउन जवळ, एम.आय.डी.सी यास ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता आरोपीने त्याचे साथिदार १) शुभम अशोक faarat वय ३० वर्ष रा. लाकडी टाल जवळ, वैशाली नगर, हिंगणा रोड २) अनुप संतोष अंबादे वय २० वर्ष रा. वैशाली हिंगणा रोड, याचे सोबत वरील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. गुन्हयातील वाहने जप्त करण्यात आले. आरोपीना सखोल विचारपूस केली असता त्यांनी २) पोलीस ठाणे एम. आय. डी. सी हदीतून दुचाकी क्र. एम. एच. ४० के ८१३७ ३) पोलीस ठाणे यशोधरानगर हदीतून दुचाकी वाहन क एम एच ४० ए. एल. ७८७५ ४) पोलीस ठाणे धंतोली हदीतून दुचाकी वाहन क एम.एच ३१ वि.यू. ०६७२५) पोलीस ठाणे गोंदीया येथून दुचाकी क्र. एम.एच ३५ वि ८४३६ असे एकुण ५ वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन वरील पाचही वाहने एकूण किमती १,८५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालासह एम. आय. डी. सी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा ना.पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली पोनि सुहास चौधरी, सपोनि प्रविण महामुनी, पोहवा नुतनसिंग छाडी, विनोद देशमुख वचन राउत, नितीन वासनिक नापोअ सुनिल गुजर, सुशांत सोळंके, अजय शुक्ला सोनू भावरे, मनोज टेकाम, हेमत लोनारे, शरद चांभारे, वागेश वासनिस रितेश तुमडाम, योगेश सातपुते, शिवशंकर रोठे, रविन्द्र राउत, नितीन बोकुलकर यांनी केली.