सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 171 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवारी (7) रोजी शोध पथकाने 171 प्रकरणांची नोंद करून 94900 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 6 प्रकरणांची नोंद करून रु 1200 रुपयांचा दंड वसुल केला. सगळयांवर प्रत्येकी रु ४०० प्रमाणे दंड लावण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणा-यांवर 1 प्रकरणांची नोंद करुन रु 500 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 34 प्रकरणांची नोंद करून 13600 रुपयांची वसुली करण्यात आली.

कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 2400 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून रु 8000 दंड वसूल करण्यात आलेला आहे.शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 1000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आला. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे (मनपाच्या धोरणानुसार कार्यवाही करणे) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करुन रु 13000 दंड वसूल करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर 41 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 8200 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 38 प्रकरणांमध्ये 38000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. तसेच हरित लवाद यांनी दिलेल्या दि.03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन्स यावर कार्यवाही अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन रु 5000 दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख  वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे, हनुमान नगर झोनचे  पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे  नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृष्ण कुमार पांडे नागपूर यांचा भारत जोडो यात्रा दरम्यान हृदयविकाराने मृत्यू ..

Tue Nov 8 , 2022
नांदेड :- भारत जोडो यात्रा दरम्यान आज अटकली जिल्हा नांदेड येथे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे नागपूर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. भारत जोडो यात्रेचे झेंडा तुकडीचे संचालन केले त्या दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता, त्यांना तात्काळ अंबुलन्स मधून दवाखान्यात दाखल केले त्यावेळी त्यांचे दुःखद निधन झाले.. दुपारच्या कॅम्पमधे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!