नागपूर :-जागतिक कीर्तीचे बौद्ध पंडित अनागारिक धम्मपाल यांची 160 वी जयंती पाली व बौद्ध अध्ययन विभागातील विद्यार्थ्यांच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्रात साजरी केल्या जाणार आहे. आज पाली व बौद्ध अध्ययन च्या आजी- माजी विद्यार्थी संघांद्वारे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालीच्या प्राध्यापिका सरोज वाणी होत्या.
17 सप्टेंबर रोजी प्रथम सत्रात अनागारिक धम्मपाल यांच्या काल व कर्तुत्वावर व्याख्यान होईल. व दुसऱ्या सत्रात पाली व बौद्ध अध्ययन च्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सामुहिकरित्या प्रमाणपत्राचे (डिग्री) वितरण करण्याचे निश्चित करण्यात आले.
कार्यक्रमाची भूमिका विभाग प्रमुख डॉक्टर निरज बोधी यांनी समजावून सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव उत्तम शेवडे यांनी केले. सूत्रसंचालन समिती च्या कोषाध्यक्ष डॉ प्रतिभा गेडाम यांनी तर समारोप प्रा सुजित बोधी यांनी केला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सखाराम मंडपे, भीक्खू महेंद्र कौसल, विठ्ठल अलोने, आम्रपाली गजभिये, प्रा बिना नगरारे, प्रीती रामटेके, भीमराव कांबळे, सचिन देव, अधीर बागडे, सुखदेव चिंचखेडे, देविदास सहारे, सिद्धार्थ खोब्रागडे, विजय वासनिक, सिद्धार्थ फोपरे, किशोर भैसारे, परशराम पाटील, मोरेश्वर मंडपे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थी संमेलनाला आतापर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना विशेषता निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.