नागपूर :-सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत प्रहार मिल्ट्री स्कूल मध्ये 16 डिसेंबर ‘ विजय दिवस’ सोहळा संपन्न. भारत पाकिस्तान या १९७१ मध्ये झालेल्या युद्धात आपल्या भारतीय सैनिकांनी विजय मिळविला होता म्हणून या विजय दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्यक्रमाचे आयोजन प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये उत्साहात केले जाते. सर्वप्रथम प्रमुख अतिथींचे स्वागत विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलनाने करण्यात आले. विजय दिवस सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून मेजर जनरल ए.पी.बाम (सेवा मेडल.विशिष्ट सेवा मेडल), ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी (निवृत्त ) सी.पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटीचे सदस्य तसेच प्राचार्या वंदना कुलकर्णी यांनी भारत माता पूजन केले. तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते अमर जवानाला सलामी देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
व्यासपीठावर उपस्थित अतिथींना सन्मानचिन्ह व रोप देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
विजय दिवस सोहळ्याच्या निमित्याने शाळेतील शिक्षिका मृणाल कुलकर्णी यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ या देशभक्तीपर गीताचे अतिसुंदर असे गायन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी जोश पूर्ण अशा रंगतदार देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेजर जनरल ए.पी.बाम (एस.एम) (व्ही.एस.एम) (निवृत्त) यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने घेतलेले उपक्रम स्तुत्यपर आहेत. आपल्या मातृभूमी विषयी असलेले प्रेम असेच कायमस्वरूपी राहोत आणि सदैव आपल्या देशाचा आदर असाच टिकून राहो असे वक्तव्य विद्यार्थ्यांना केले. त्याचबरोबर इंडो पाक युद्धाबद्दलची थोडक्यात माहिती सांगितली. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका अर्चना बन्सोड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेच्या शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा शिक्षक या सर्वांचा सहभाग होता. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली.