संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– समग्र शिक्षा अभियान अंतर्गत नियोजन सुरू
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कामठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने वर्ग 1 ते 8 मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके दिली जाणार आहे त्यानुसार शैक्षणिक सत्र 2024-मध्ये कामठी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खाजगि अनुदानीत शाळेतील वर्ग 1 ते 8 च्या एकूण 15 हजार 738 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठय पुस्तके मिळणार आहेत. सदर पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी तयार केली आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी वर्ग 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या 15 हजात 738 पाठयपुस्तकात मराठी माध्यमचे 8 हजार 789 पुस्तके, हिंदी माध्यमचे 2 हजार 590 पुस्तके,इंग्रजी माध्यम च्या 483 पुस्तके, तसेच उर्दू माध्यमचे 3 हजार 876 पुस्तकांचा समावेश असून एकूण 120 विषयांपैकी 85 विषयाच्या पुस्तका प्राप्त झाल्या असून 35 विषयांच्या पुस्तका अजूनही प्राप्त होणे बाकी आहे यानुसार एकूण मागणी पैकी 70 टक्के पाठयपुस्तकाचा पुरवठा झाला आहे.
कामठी तालुकास्तरावरुन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे यांच्या नियोजनानुसार शाळा स्तरापर्यंत पाठयपुस्तके पोहोचविली जाणार आहेत.तसे नियोजन सुरू असून या नियोजनात शिक्षण विभागाचे साधनव्यक्ती विषयतज्ज्ञ शंकर कांबळे,विषयतज्ञ दिनेश ठाकरे, विषयतज्ञ शालिनी खोब्रागडे मोलाची भूमिका साकारत आहेत.