बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना 15 ताडपत्री धम्मदान

‘द डिवाईन ग्रुप‘चा अभिनव उपक्रम

नागपूर –
गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांची 2566 वी जयंतीचे औचित्य साधून दुर्देवी अग्निकांडातील पीडितांसाठी मदतीचा हात म्हणून ‘द डिवाईन ग्रुप‘चे संयोजक व जेसीआय नागपूर सेंट्रलचे उपाध्यक्ष अश्विन धनविजय यांनी 15 ताडपत्री (टारपोलीन) धम्मदानाचा अभिनव उपक्रम हाती घेतला. ‘द डिवाईन ग्रुप‘चे संयोजक अश्विन धनविजय यांच्या मार्गदर्शनात रमन कलवले, अॅनोष थाॅमस यांनी ताडपत्रीला लागणारे इतर साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच या अग्नितांडवात नुकासनग्रस्ताना पुढेही मदत म्हणून मुलांना शैक्षिणीक साहित्य देण्यात निर्धार ‘द डिवाईन ग्रुप‘ व जेसीआय नागपूर सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी जेसीआय नागपूर अध्यक्ष प्रिया आचार्य, सचिव आदिती पाॅल, श्रीरंग नेने, अनुज माथूर, मयुरी मेहेरे, दत्ता सुरर्वसे, कमलेश सिरसीकर, ‘द डिवाईन ग्रुप‘चे पीयूष कांबळे, अक्षय वनकर, आदिंची उपस्थिती होती.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नवनिर्माण ब्रम्ह कुमारी सेंटर बाधकामाचे भुमीपुजन

Mon May 16 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी साई नगरी कांद्री येथे राजयोगीनी प्रेमलता दीदी च्या हस्ते संपन्न. कन्हान : – साईनगरी कांदी ला प्रजापिता ब्रम्ह कुमारी ईश्वरिय विश्व विद्यालय कन्हान सेन्टर अंतर्गत कामठी सेटर च्या राजयोगिनी ब्रम्ह कुमारी प्रेमलता दिदी च्या प्रमुख हस्ते कांद्री गावातील साईनगरी येथे विधीवत पुजा अर्चना करून नवनिर्माण ब्रम्ह कुमारी सेंटर बांध कामाचे भुमीपुजन सोहळा संपन्न करण्यात आला. सोमवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com