सोयाबीन हमीभाव विक्रीच्या नोंदणीला १५ दिवसांची मुदत वाढ

– ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकरी नोंदणी करू शकत होते. परंतु अद्यापही सोयाबीन हमीभाव केंद्राला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असल्याने पुन्हा एकदा १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे

काटोल/कोंढाळी :- बारदाना तुटवड्याच्या कारणानं सोयाबीन खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष सोयाबीन खरेदीसाठी उशीर झाला. त्यात ओलाव्याचं प्रमाण अधिक असल्याने सोयाबीन खरेदीला वेग आलेला नव्हता. त्यात हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीची नोंदणी मुदत संपत आली आहे. परिणामी सरकारने यापूर्वीच नोंदणीला मुदत वाढ दिली होती. मात्र अद्यापही खरेदीला वेग न आल्याने १५ डिसेंबरपर्यंत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती मार्केट फेडरेशनकडून देण्यात आली आहे. अशी माहिती खत्री यांनी दिली आहे.

सध्या खुल्या बाजारात ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. तर सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये सरकारने जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी करून सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन कोंढाळी व परिसरातील शेतकरी प्रकाश बारंगे, सुरेश गांधी, स्वप्निल व्यास, बालकिसन पालीवाल, पदम डेहनकर, नरेश नागपूरे, रवी जयस्वाल,राजु धारपुरे,राजु किनेकर, चंद्रशेखर ढोरे, रमेश चव्हाण, उत्तम काळे, किस्मत चौहान, शेतीविषय जाणकार करत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रानडुकराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार

Fri Nov 29 , 2024
कोंढाळी :- रानडुकराने धडक दिल्या नंतर दुचाकीला झालेल्या अपघातात मोहन गोविंदराव लक्षणे (२२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळी (काळबांडे) येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृतक मोहन गोविंदराव लक्षणे (वय २२, देवळी काळबांडे) हा एमएच ४०, सीव्ही ९८०९ क्रमाकांच्या हीरो स्प्लेंडरने खासगी कंपनीत कामावर जात असताना वलनी नाल्याजवळ रान डुकरांचा कळपाने त्याला धडक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com