सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 146प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (30) रोजी शोध पथकाने 146 प्रकरणांची नोंद करून 75,700/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 43 प्रकरणांची नोंद करून 17,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 5,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 22,500/- रुपयांची वसुली करण्यात आली.

चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 53 प्रकरणांची नोंद करून 10,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 9,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000 रुपयांची वसुली करण्यात आले. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. सागर मांगलकर यांनी मनपाची परवानगी न घेता गटार लाईन जोडल्याबद्दल रू. 15,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. फ्लेक्स ॲडवटाईझ यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत मे.देव डेवलपर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे.खांदे किराणा तसेच मे.पंकज डेयरी यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. 5,000/- हजार असे एकुण 10,000/- रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.महादेव स्वीटस तसेच मे.देशमुख किराणा यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. 5,000/- हजार असे एकुण 10,000/- रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू. 50,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

२ ऑक्टोबर रोजी आभासी पद्धतीने होणार रामाळा तलाव व सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन

Tue Oct 1 , 2024
चंद्रपूर :- २ ऑक्टोबर रोजी देशातील विविध प्रकल्पांचे उदघाटन,भूमिपुजन व लोकार्पण मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आभासी पद्धतीने केले जाणार आहे. या विविध प्रकल्पात चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव पुनर्जिवीकरण प्रकल्पाचे भूमिपुजन व सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी प्रकल्पाचे उदघाटन या दोन प्रकल्पांचा सुद्धा समावेश आहे. महानगरपालिका स्तरावर प्रियदर्शिनी सभागृहात सदर कार्यक्रम आभासी पद्धतीने लाईव्ह बघण्याची व्यवस्था मनपामार्फत २ ऑक्टोबर रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com