सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 137 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. सोमवारी (ता. 20) रोजी उपद्रव शोध पथकाने 137 प्रकरणांची नोंद करून 53 हजार 800 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 44 प्रकरणांची नोंद करून 17 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 5 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून 8 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 57 प्रकरणांची नोंद करून 11 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करुन 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवारी (ता. 20) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत ठाकुर किराणा स्टोर्स गोलीबार चौक व सतरंजीपुरा झोन अंतर्गत मांडे अगरबत्ती शांतीनगर मुदलीयार चौक या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय लकडगंज झोन अंतर्गत मास्टर कॉन्वेन्ट ओम साई नगर ओल्ड कामठी व मंगळवारी झोन अंतर्गत सन्नी स्माईल प्ले हाऊस बयरामजी टाऊन परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्याबाबत या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत साई केसल मनिष नगर यांच्याकडुन बांधकामाचा कचरा रस्त्यालगत पसरविलेल्याबाबात 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 5 प्रकरणाची नोंद करून 30 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अखिल विश्व सरयुपारीण ब्राम्हण समाज के मार्गदर्शन अंतर्गत नवशक्ती महिला संगठण का निर्माण

Mon May 20 , 2024
नागपूर :- महिला सशक्तीकरण को ध्यान मे रखते हुए अखिल विश्व सरयुपारीण ब्राम्हण समाज के वरिष्ठगण भुतपुर्व अध्यक्ष देवीप्रसाद शुक्ला, ॲङ सुरेश शुक्ला तथा वर्तमान अध्यक्ष  रामनारायण मिश्रा इनके मार्गदर्शनके अंतर्गत नवशक्ती महिला संगठण निर्माण किया गया । नवशक्ती महिला संगठणद्वारा भगवान परशुराम जयंतीका कार्यक्रम देवीप्रसाद शुक्ला, मानेवाडा रोड, नागपूर ईनके निवास स्थानपर आयोजीत किया गया भगवान परशूराम के प्रतीमा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!