सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 132 प्रकरणांची नोंद , उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवारी (2) रोजी शोध पथकाने 132 प्रकरणांची नोंद करून 56800 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी/ उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे (रु. 500/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1500 रुपयांची वसुली करण्यात आली.

हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 37 प्रकरणांची नोंद करून 14800 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 1900 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 2400 दंड वसूल करण्यात आलेला आहे.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरेजस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आला.   या व्यतिरिक्त इतर 41 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 8200 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 21 प्रकरणांमध्ये 21000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे  धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे  पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे  नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इस्त्रोची माहिती देणारी गाडी ‘स्पेस ऑन व्हिल्स’, इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण

Tue Jan 3 , 2023
नागपूर :– अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेप्रमाणे भारताची कार्यरत असलेली अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो. देशातील अनेक अंतराळ मोहीमा यशस्वीरीत्या राबवून या संस्थेने देशाचे नाव जगभर पोहोचविले आहे. अशा या संस्थेची माहिती सर्वसामान्यांना फारशी नसते. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी इस्त्रोची स्पेस ऑन व्हिल्स ही बस (मोटारगाडी) असून इंडियन सायन्स काँग्रेसमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.         […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com