१३ अनधिकृत जाहिरात फलक पाडले

– मनपाची कारवाई, इतर सर्वांना नोटीस

चंद्रपूर :- चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली असून तीनही झोन मिळुन एकूण १३ जाहीरात फलकांवर निष्कासनाची कारवाई आली आहे. तसेच पुढील दिवसांत शहरातील उर्वरित अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्तांनी मुंबई दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेत शहरातील धोकादायक जाहिरात फलकांची तपासणी करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शहरातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सुरू असुन या सर्वेक्षणामध्ये १२४ अधिकृत तर ४० अनधिकृत जाहिरात फलक आढळुन आले आहेत. यात झोन क्र.१ अंतर्गत २०, झोन क्र.२ अंतर्गत १३ तर झोन क्र.३ अंतर्गत ७ अनधिकृत फलक आहेत.

या सर्व अनधिकृत फलकांना जाहीरात फलकांचे संरचना मजबुती प्रमाणपत्र ( Structural stability certificate ) विमा पॉलिसी, फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट व इतर आवश्यक दस्तावेज सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आढळलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांपैकी झोन क्र.१ अंतर्गत ८ जाहिरात फलक,झोन क्र.२ अंतर्गत ४ जाहिरात फलक तर झोन क्र.३ अंतर्गत १ असे एकुण १३ जाहिरात फलक काढण्यात आले असुन इतर काढण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पेट्रोलपंप आवारातील होर्डींग धारकांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.रेल्वे प्रशासनाच्या परिसरात असलेल्या जाहिरात फलकांच्या स्थितीबाबत मनपाला रेल्वे प्रशासनाने अद्याप अवगत केलेले नाही. मान्सुनपूर्व व अन्य कालावधीत होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यास रेल्वे प्रशासन परिसरातील जाहिरात फलक काढण्यास रेल्वे प्रशासनास कळविण्यात आलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेतली शपथ

Tue May 21 , 2024
नवी दिल्ली :- देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 33 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनानिमित्त, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात शपथ घेण्यात आली . कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना, “आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com