नागपूर :- दिनांक १०.०८.२०२३ ला यशोधरानगर पोलीसांचे तपास पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्याना माहिती मिळाली की कळमणा येथून टोयोटा इनोव्हा गाडी क एम.एच. ३१ सि.आर. ४२४१ ह्या वाहना मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखुची अवैध वाहतुक करीत आहे. अशा माहिती वरून ईटा भट्टी चौक, नागपूर येथे नमुद वाहन थांबवुन पाहणी केली असता, त्यामध्ये शासनाने प्रतीबंधीत केलेला सुंगधीत तंबाखू बाबा मजा, रिमझीम, राजश्री पान मसाला असे विवीध कंपनीचा ५५ प्लास्टीक बॅगमध्ये वाहतुक करतांना आरोपी शंकर शिवम ढोरे वय ३१ वर्ष रा. शंकरपूर बोडखी, पोस्ट खापरी, वर्धा रोड, नागपूर समक्ष मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातून वाहनासह मुद्देमाल किमती अंदाजे एकूण १२,३९,३६९ /- रू मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर अन्नसाठा अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य याचे अधिसूचना का असुमाका / अधिसुचना /५००/०७ दिनांक १५/०७/२०२१ अन्वये महाराष्ट्र राज्यात उत्पादन, वितरण, विक्री, साठा व वाहतुकीस सदर मुद्देमालास प्रतीबंध घालण्यात आलेला आहे. त्यानुसार आरोपी याचे कृत्य कलम १८८. २७२ २७३. (३२८ भादवी, सहकलम २६ (१) २६(४) २७(३) (ई), अन्न व सुरक्षा व मानदे अधिनियम, सहकलम ३० (२) (अ), (७३(१)(३) ५९ अधिसूचना अन्वये गुन्हा होत असल्याने फिर्यादी अर्चना खंदारे अन्न सुरक्षा अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या रिपोर्टवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेवून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस उप-आयुक्त (परिक) यांचे मार्गदर्शना खाली वपोनि ज्ञानेश्वर भेदोडकर, सपने विलास मोटे, पोउपनि सचिन भालेराव, पोहवा श्याम कडू, अमोल भांबुरकर, नापोअ, मंगेश गिरी,किशोर धोटे, पोअ नरेन्द्र जांभुळकर, रामेश्वर गेडाम, रोहित रामटेके, अक्षय कुलसंगे, नारायण कोहवर्ड अमीत ठाकुर यांनी केली.