– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.७) रोजी उपद्रव शोध पथकाने १२० प्रकरणांची नोंद करून १ लाख ५ हजार ९०० रुपयाचा दंड वसूल केला.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ४६ प्रकरणांची नोंद करून १८,४०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत १२ प्रकरणांची नोंद करून १२०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा आशा ठिकाणी कचरा टाकणे या याअंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.
वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून १५५०० रुपयांची वसुली करण्यात आली. वैद्यकीय व्यावसायिकांनी बायोमेडिकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे याअंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २५००० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे प्रथम या अंतर्गत ०१ प्रकरणाची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास ३४ प्रकरणांची नोंद करून रु ६८०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०८ प्रकरणांची नोंद करून रु ८००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे याअंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २५००० रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
*प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यां १२ प्रकरणाची नोंद*
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या १२ प्रकरणांची नोंद करून १ लाख १५००० रुपयाचा दंड वसूल केला. यात प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणे याअंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून २५००० रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच पक्वासा रुग्णालय यांच्या वर बायोमेडिकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे याप्रकरणी कारवाई करीत २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.