संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोळसा टॉल रहिवासी आरोपीने 12 वर्षोय अल्पवयीन मुलीला कामानिमित्त तिला आपल्या घरात बोलावून घराचे दार बंद करून तिचा विनयभंग केल्याची घटना काल सकाळी 10 वाजता घडली असून यासंदर्भात जुनी कामठी पोलिसांनी आरोपी बशीर भाई अहमद वय 55 वर्षे रा कोळसा टॉल कामठी विरुद्ध भादवी कलम 354,354(अ),भादवी सह कलम 8,12 पोक्सो कायद्या अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ राखुंडे करीत आहेत.