संदीप कांबळे,कामठी
नागपुर १ मे : नागरिकांचे गहाळ झालेले 12 महागडे मोबाईल जरीपटका नागपूर पोलिसांनी आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने परत केले आहेत. पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल पैकी 12 मोबाईल परिमंडळ क्र 5 चे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक गौरख कुंभार यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले. पोलीस अंमलदार उपेंद्र आकोटकर व सुनील यादव यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले.
नागपूर परिमंडळ क्र 5 अंतर्गत महागडे मोबाईल हरवणे व गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याने त्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यात होत असत. त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी परिमंडळ क्र 5 चे पोलीस उप आयुक्त चिन्मय पंडित यांनी एक विशेष पथक कार्यरत केले आणि शोध सुरू केला.
या पथकात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार उपेंद्र आकोटकर व सुनील यादव यांनी मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेत 12 मोबाईलचा शोध लावून संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले आहेत. यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
नागरिकांचे गहाळ झालेले 12 मोबाईल जरीपटका पोलिसांकडून परत
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com