सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 118 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (1) रोजी शोध पथकाने 118 प्रकरणांची नोंद करून 60100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 2 प्रकरणांची नोंद करून रु 400 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 9200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 1400 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रु 1600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 1000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आलेला आहे.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून रु 21500 दंड वसूल करण्यात आला.

या व्यतिरिक्त इतर 45 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 9000 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 14 प्रकरणांमध्ये 14000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख  वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे  पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामझूला फैस 1 वापस चालु कराने के लिए कांग्रेस ने किया आंदोलन

Thu Feb 2 , 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र 2 के हाथो किया रामझूला फैस 1 का उदघाटन रामझूला फैस 1 पे कांग्रेसियों ने दोहडाई बाइक व कार नागपुर :- शहर कांग्रेस कमेटी अध्यक्ष आमदार विकास ठाकरे और प्रदेश अल्पसंख्यक अध्यक्ष आमदार डॉक्टर. वाजाहत मिर्ज़ा के आदेश अनुसार नागपुर शहर (जिल्हा) कांग्रेस कमेटी के अध्यक्ष वसीम खान के नेतृत्व में आज राममंदिर के सामने रामझूला फैस 1 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com