सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 114 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई   

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. सोमवारी (ता. 24) रोजी उपद्रव शोध पथकाने 114 प्रकरणांची नोंद करून 60 हजार 400 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करुन 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 40 प्रकरणांची नोंद करून 16 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 19 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 33 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 9 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 01 प्रकरणांची नोंद

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवारी (ता. 24) रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत विठ्ठल स्वीट्स लेंडी तलाव तांडापेठ यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय नेहरुनगर झोन अंतर्गत जी इन्फ्रा नागपूर शक्तीमाता नगर वाठोडा रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत यांच्याकडुन 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत सारथी पब्लीक स्कुल ढाबा परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास यांच्याकडून 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 3 प्रकरणांची नोंद करून 20 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीएचडी संशोधकांचा फेलोशिपसाठी आजपासून लॉन्गमार्च, नागपुरात निवेदन

Tue Jun 25 , 2024
नागपूर :- मागील 2022 पासून आजपर्यंत ज्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली नाही, अशा बार्टी, सारथी व महाज्योती पीएचडी संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आजपासून फुलेवाडा पुणे ते विधान भवन मुंबई असा पायी लॉंगमार्च सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री अर्थमंत्री व महासंचालक ह्यांना आपल्या मागण्यांचे एक संयुक्त निवेदन देण्यात आलेले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com