प्रोत्साहन राशीचा लाभ मिळाला 113 शेतकऱ्यांना

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन रक्कम जमा करण्यात आली असून कामठी तालुक्यातील एकूण 944 शेतकरी पात्र लाभार्थी असून यातील पहिल्या यादीतील 115 पैकी 113 लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 55 लक्ष रुपये प्रोत्साहन राशी जमा करण्यात आली असून यानंतर यादीत येणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना टप्पानिहाय प्रोत्साहन राशी देण्यात येणार आहे त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार लिंक करणे आवश्यक आहे.

पीक कर्ज शासन विविध बँकांच्या मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. बँकांमार्फत शेतकऱ्यांना अल्प,मध्यम व दीर्घ कालावधीचे पीक कर्ज दिले जाते .अल्पमुदतीच्या पीक कर्जावर 1 लाखाच्या मर्यादेत 31 मार्च पर्यंत रक्कम भरल्यास व्याज आकारले जात नाही.3लाख रुपयाच्या पीक कर्जावर 6 टक्के व्याज दराने पिककर्ज दिले जाते यातही वेळेत पीक कर्जाची परतफेड केल्यास शासनातर्फे 2 टक्क्यांची सूट दिली जाते. याच बळावर शेतकरी शेती करतात मात्र कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकत नाही परिणामी त्यांच्यावर कर्जाचे डोंगर वाढत जाते अशा परिस्थितीत कर्जमुक्तीची मागणी सर्वच स्तरावर होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येरखेड्यात आतापासूनच सरपंच पदावरून राजकारण तापले

Tue Nov 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या 27 ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 18 डिसेंबर ला होणार असून 28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल केल्या जाणार आहे तर या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच पदाची निवड होणार असून सरपंच पदासह सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी संबंधित गावात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे तसेच राजकिय हालचालींना वेग आल्याने गावांतर्गत निवडणूक पूर्व वातावरण तापू लागले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com