10 वी 12 वी च्या खाजगी परिक्षार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ, फॉर्म-17 भरण्यास 30 सप्टेंबरची मुदत

नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्खिक्षण मंडळामार्फत इयत्ता १० वी १२ वी च्या माहे फेब्रुवारी-मार्च 2024 च्या परीक्षेस फॉर्म 17 द्वारे खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाई पध्दतीने भरण्यासाठी दिनांक 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. तसेच मुळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या माध्यमिक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 हा कालावधी देण्यात आला आहे. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावती एक छायाप्रत मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सूचना व अधिक माहितीसाठी इयता 10 वी साठी http://form17.mh-ssc.ac.in तर 12 वी साठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे नागपूर विभागीय मंडळाचे सचिव चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामदेवबाबा पैदल ध्वजायात्रा का आयोजन

Fri Sep 15 , 2023
काटोल :- माहेश्वरी युवा संगठन सीताबर्डी, नागपुर द्वारा सोमवार दि.१६ सितंबर २०२३ को सुबह ०७:३० बजे रामदेवबाबा मंदिर माहेश्वरी पंचायत भवन ,टेकड़ी रोड, सीताबर्डी , से आरती करकर रामदेवबाबा मंदिर, काटोल रोड तक पैदल ध्वजायात्रा का आयोजन किया जा रहा है| यात्रा माहेश्वरी पंचायत भवन बर्डी से जीरो माइल, आर.बी.आय चौक , लिबर्टी चौक, सदर छावनी चौक, पोलीस लाइन टाकली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com