नागपूर :- आज दिनांक २०,०७,२०२३ रोजी सकाळी ०८:०० वा पोलीस भवन, सिव्हील लाईन, नागपुर येथे पोलीस आयुक्त नागपुर शहर अमितेश कुमार यांनी पोलीस अधिकारी व अमलदार यांचे शारिरीक स्वास्थ सुदृढ रहावे यानिमीत्ताने आयोजीत १० कि.मी. नागपुर पोलीस मॅरेथॉनला सह पोलीस आयुक्त अक्ष्वती दोर्जे यांचे व वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचे उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली.
अति उत्साहात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर हजरी लावली. मॅरथॉन मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहात मॅरेथॉन मध्ये भाग घेतला. स्पर्धेमध्ये नागपूर शहरातील सर्व पोलीस ठाणे येथील विट मार्शल यांनी प्रामुख्याने हजेरी लावली होती. १० कि. मी. मॅरेथान स्पर्धेची पोलीस भवन येथून सुरवात होवुन जपानी गार्डन, टीवी टॉवर, वायुसेना नगर, फुटाळा तलाव, तेलंगखड़ी मंदिर, सीपी क्लब, वॉकर्स रोड, पोलीस जिमखाना येथून परत पोलीस भवन येथे मॅरेथॉन समाप्ती झाली.
मॅरेथॉन मध्ये भाग घेणारे स्पर्धेक विशेषतः विट मार्शल यांचे ३० वर्षांखालील वयोगट, ४० वर्षांखालील वयोगट व ४० वर्षांवरील वयोगट यांचेत स्पर्धा देण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम, व्दितीय, तृतीय आलेल्या स्पर्धकांना पोलीस आयुक्त त्यांचे हस्ते पारितोषीकपर मेडल प्रदान करण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने पोलीस अमलदार १) विकी बोहरे २) चेतन जाधव ३) संतोष शिवणकर ४) अतुल फरताळे यांचा समावेश आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी स्पर्धे मध्ये १० कि. मी. अंतर १ तास ११ मिनीटात पुर्ण केल्या बद्दल शिवाजीराव राठोड, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रभाग यांचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला.
पोलीस आयुक्त यांनी स्पर्धेमागचे उद्देश समजावून पोलीस अधिकारी व अमलदार त्यांचे शारिरीक फिटनेस आवश्यक असल्याचे व त्यामुळे स्वास्थ मजबूत राहण्यास मदत होवून शरीर व जिवन निरोगी राहण्यास मदत होते. दैनंदिन कामकाज उत्साहात पार पडते व समाजाला मदत होते असे मनोगत व्यक्त करून वेळोवेळी अश्या स्पर्धांचे आयोजन करण्याची आवश्यकता समजाविली. स्पर्धेमध्ये पोलीस आयुक्त यांनी स्वतः तसेच सर्व वरीष्ठ पोलीस अधिकारी व बहुसंख्येने पोलीस अमलदार यांनी भाग घेतला.